साताराः आज भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या.आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या. या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत.
मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झाल आहे.
आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे.. नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबत ची यादी फायनल करतील.. असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.