सातारा : पुढारी वृत्तसेवा
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका (जि. सातारा) येथे आज (रविवार) सकाळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील महिला जागीच ठार झाली. कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने महिलेच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या झाल्या. विद्या पटवर्धन (वय ६५, रा. सांगली) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, हा अपघात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला. पटवर्धन दाम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली. सुमारे २० मीटर कंटेनरने दुचाकीला फरफटत नेले. दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.