सातारा : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाची शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्त्यांनी जाळून होळी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत भोसले आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर हे पुस्तक फाडून, जाळून त्याची होळी केली आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे होळी करण्यात आली.यापुढे संजय राऊत याला सातारा जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देखील दिला आहे.