सातारा

सातारा : चोरट्यांचा ३० तोळे सोन्यावर डल्ला; सेवानिवृत्त पोलिसाच्या बंगल्यात चोरी

Shambhuraj Pachindre

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : भुयाचीवाडी (ता. कराड) येथे सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने असा  लाखो रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना सोमवारी ( दि.२७) उघडकीस आली आहे. सदर घटनेची नोंद रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सेवानिवृत्त पोलिस सुरेश धोंडीराम कदम मुळ गांव भुयाचीवाडी (ता.कराड, सध्या रा.कल्याण भिवंडी (ठाणे)) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानुगडेवाडी ता.पाटण येथे फिर्यादी हे नाईकबा यात्रे निमित्त गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याचा सेप्टी दरवाजा बंद करून त्यास कुलप लावले होते.   सोमवार दिनांक २७ मार्च रोजी फिर्यादी यांचे बंधू यांनी फोन करून सांगितले की, बंगल्याचा सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून बंगल्यात चोरी झालेली आहे. चोरट्यानी  बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचा कोयंडा तोडुन बंगल्यात  प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाट कटावणीने उचकटून त्यामध्ये असणारे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून लंपास केली.

चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची  सध्य परिस्थितीच्या बाजारभावाने चोरीला गेलेल्या  ३० तोळे सोन्याची किंमत १८ लाख रुपयांच्या आसपास होत आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सपोनि अजय गोरड करीत आहेत.

भुयाचीवाडी  नविन गावठाण येथे याच दिवशी मध्यरात्री   सुदाम लोहार हे घराच्या पुढील बाजूला असलेल्या शेडमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या पत्नी च्या गळ्यातील दिड तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. यावेळी सुदाम लोहार यांनी चोरट्याचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.

सध्या रात्रीची बंद घरे फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झालेली असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी तसेच गावांमध्ये येणारे फिरस्ते व अनोळखी व्यक्ती बाबतची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील व पोलीस स्टेशनला द्यावी.

अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज

 

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT