Nicotine Gum File Photo
सातारा

Nicotine gum dangers: एका च्युईंगममुळे शरीरात जाते तब्बल चार सिगारेट इतके निकोटिन

एका च्युईंगममुळे तब्बल चार सिगारेट इतके निकोटीन शरीरात जाते. त्यामुळे शरीरात निकोटिनचे प्रमाण वाढून आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Nicotine gum dangers

सातारा : मीना शिंदे

तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन सोडवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट दुकानातून विकत घेत नागरिकांकडून निकोटिन गमचा वापर केला जात आहे. या एका च्युईंगममुळे तब्बल चार सिगारेट इतके निकोटीन शरीरात जात आहे. त्यामुळे शरीरात निकोटिनचे प्रमाण वाढून आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

तंबाखू व सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय निकोटिन गम घेणे घातक ठरत आहे. सिगारेट ओढणे हल्ली तरुणांमध्ये फॅशन समजली जाते. शहरी व निमशहरी भागातही रस्त्याच्या कडेला, शाळा-कॉलेजच्या मार्गावर जागोजागी टपऱ्या वाढत आहेत. याच टपऱ्यांवर, स्नॅक सेंटरवर तरुणाई सिगारेटचे झुरके घेताना दिसते.

सुरुवातीला गंमत म्हणून केलेली सुरुवात व्यसनात रुपांतरीत होते तेव्हा ते आरोग्यावर बेतते. याची जाणीव खूप कमी लोकांना होते. मग ती सवय सोडवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू होतात.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटिन हा घटक मानवी आरोग्यास घातक ठरतो. आरोग्य बिघडण्याच्या धास्तीने अनेकजण ते सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र, सवय सुटत नाही. मग थेट मेडिकलमधून निकोटिन गम घेतात. हे एक प्रकारचे च्युईंगम असून, ते खाण्यामुळे शरीरात निकोटिनचे प्रमाण नकळतपणे वाढते

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे एक गंभीर व्यसन आहे. ते सोडण्याची स्वतःची मानसिकता व तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निकोटिन च्युईंगम हे सहज उपलब्ध असले तरी ते घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते.
- डॉ. हमीद दाभोळकर, संस्थापक, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT