Satara Kas Pushp Pathar Flower Conservation
सातारा: जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठारावर काही दिवसांपासून या भागामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे आताSatara News पर्यटकांना खुणावू लागल्याने कास पठार कार्यकारी समितीकडून पठारावर तंगुसाची जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गतवर्षी जून महिन्यानंतर कास पुष्प पठारावरील हंगामाची तयारीची सुरुवात कास पठार कार्यकारी समितीकडून करण्यात आली होती. मात्र, यावर्षी लवकरच पर्यटकांचा ओढा पठारावर आल्याने आतापासूनच समितीच्या कर्मचाऱ्यांना पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज भासू लागली आहे. कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम दरवर्षी एक सप्टेंबररोजी सुरू करण्यात येतो. मात्र, यावर्षी नैसर्गिक वातावरण वेगळे असल्याने हा हंगाम कोणत्या कालावधीत सुरू करण्यात येईल. हे अद्याप सांगता येत नाही.
मात्र, कास पुष्प पठारावर गेल्या काही दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे पठारावरील छोटी मोठी फुले व उमलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुट्टीच्या व इतर दिवशी पर्यटक पठारावर गर्दी करत आहेत. पठारावरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक पोल फक्त उभे होते. त्याला जाळी नसल्याने पर्यटक संपूर्ण पठारावर फिरत होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या फुलांच्या कळ्यांवर पाऊल पडून फुलांचे नुकसान होत होते.
मात्र, या गोष्टी कास पठार कार्यकारी समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तंगुसाची जाळी बसविण्याच्या कामाला सुरुवात केली. येत्या काही दिवसात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी समितीकडून सांगण्यात आली.