Satara-Kaas Road Landslide
Satara-Kaas Road Landslide : सातारा-कास रोडवरील यवतेश्वर घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरुsatara News

Satara-Kaas Road Landslide : सातारा-कास रोडवरील यवतेश्वर घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरु

रात्री उशिरा दरड कोसळल्‍याची घटना घडली आहे, अद्याप प्रशासन येथे पोहोचलेले नाही.
Published on

Satara-Kaas Road Landslide: Landslide occurred at Yavateshwar Ghat on Satara-Kaas Road

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे. रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाही.

Satara-Kaas Road Landslide
Rain Alert: संपूर्ण राज्याला उद्या ‘रेड अलर्ट’; 27 मेपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा

सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news