मृत विपुल ऊर्फ डॉन मुर्म Pudhari Photo
सातारा

फलटण : परप्रांतीय हॉटेल कामगाराचा खून

पुढारी वृत्तसेवा

फलटण : पुढारी वृत्तसेवा

कोळकी (ता. फलटण) येथील आमंत्रण हॉटेलमधील परप्रांतीय कामगाराला पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. विपुल ऊर्फ डॉन मुर्म (रा. ओडिशा राज्य (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) असे खून झालेल्या हॉटेल कामगाराचे नाव आहे; तर अमोल वनारे (रा. कोळकी ता. फलटण) व सलमान रफिक शेख (रा. सोनवडी, ता. फलटण) अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दहिवडी शिंगणापूर चौकातील पान टपरीचा मालक अमोल वनारे व त्याचा मित्र सलमान रफिक शेख हे जेवणाचे पार्सल नेण्यासाठी दुचाकीवरून आमंत्रण हॉटेल येथे गेले होते. अमोल वनारे याने पार्सलची ऑर्डर दिली. त्यावेळी हॉटेलचे मॅनेजर अक्षय भालचंद्र काळे यांनी रोटी व भाकरी पॅक करण्यासाठी कागद आणण्याबाबत विपुलला सांगितले. त्यावेळी विपुलने काळे यांना काहीतरी बोलून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अमोल याने विपुलच्या डोक्यात टपली मारली. त्यावरून विपुल व वनारे यांच्यात झटापट झाली. दरम्यान, सलमान रफिक शेख यानेही विपुलला मारहाण केली.

अमोल वनारे याने लोखंडी सळईने डोक्यात,शरीरावर मारहाण केल्याने विपुल गंभीर जखमी झाला. त्याल कोळकी येथील हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच विपुलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहाय्यक पोलिस फौजदार नितीन शिंदे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT