अतुल सूर्यवंशीpudhari photo
नाशिक
Nashik Crime Update | नाशिक पुन्हा हादरलं ! पंचवटीत मध्यरात्री युवकाचा खून
हमाल तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या
पंचवटी : पंचवटी कारंजा येथील नरोत्तम भवन समोर रस्त्यावर मार्केट यार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवार (दि.१०) रोजी मध्यरात्री सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. अतुल सूर्यवंशी (वय ३२, रा. पेठ रोड, पंचवटी, नाशिक) असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अतुल सूर्यवंशी हा पेठ रोडवरील रहिवासी असून तो मार्केट यार्ड येथे आपल्या मोठ्या भावाकडे हमालीचा काम करत असे. मंगळवार (दि.१०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटीतील नरोत्तम भवन समोर रस्त्यावर अतुल याचा काही संशयितांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश मिळाले असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)