सातारा

जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी बळ दे..!; उदयनराजे यांचे शंभू महादेवाला साकडे

अविनाश सुतार

शिखर शिंगणापूर: पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना खासदार उदयनराजे यांनी या वेळी केली. नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही शंभू महादेवाचे दर्शन घेतले.

दरवर्षीप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्रावणातील शेवटच्या सोमवारी शंभू महादेवास महापूजा करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवून जनहिताची कामे करण्यासाठी बळ दे !' असे साकडे शंभू महादेवास घातले.  नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही शंभू महादेवाचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शंभू महादेवाकडे प्रार्थना केली. यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष करण पोरे, सुनील काटकर, महेश गुरव, डॉ. जे. टी. पोळ उपस्थित होते.

शंभू महादेव देवस्थान समिती व सर्व सेवाधारी यांच्या हस्ते खासदार उदयनराजे भोसले व जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार सूर्यकांत येवले, दहिवडीचे सपोनि संतोष तासगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक ओंकार देशपांडे, मोहन बडवे, शैलेश बडवे यासह सेवाधारी उपस्थित होते.  श्रावणी सोमवारनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT