श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अश्वांची वैद्यकीय तपासणी होणार Pudhari Photo
सातारा

सोहळ्यातील अश्वांची वैद्यकीय तपासणी

पशुसंवर्धन विभागाचे पथक : तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

सातारा, पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 6 ते 11 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करताना पालखीसोबत असणारे अश्व, बैल यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालखी मार्गावर लोणंद पालखी, तळ, तरडगाव पालखी तळ, फलटण पालखी तळ, बरड पालखी तळ येथे हे पथक पशुवैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यासाठी पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त डॉ. विश्वंभर पवार सनियंत्रण अधिकारी म्हणून काम करणार आहेत. त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. हे पथक पालखीमध्ये सर्व प्राण्यांची स्वास्थ्य विषयक तपासणी व उपचार करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक दिवसाला एक पथक अशी चार पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके सर्व पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सज्ज राहणार आहेत.

पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी खटाव तालुक्याचे पशुचिकित्सा पथकाचे मोबाईल व्हॅन वाहन पालखी मार्गावर तैनात राहणार आहे. पालखी सोहळ्यात या मोबाईल व्हॅनचा वापर चित्ररथ म्हणून करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती या चित्ररथामार्फत दिली जाणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणारा वारकरी हा शेतकरी आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्याच्या प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दि. भा. बोर्डे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT