Many brothers in police custody in connection with the murder
सातारा खून प्रकरण Pudhari File Photo
सातारा

खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : केळवली, ता. सातारा येथे जेसीबी कामात आडकाठी आणल्याच्या रागातून चिडून शिकारीसाठीच्या बंदुकीने खून केल्याप्रकरणी सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. शंकर दादू जानकर व चिमाजी दादू जानकर (दोघे रा.केळवली पो.नित्रळ ता.सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 3 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली शिकारीची बंदूक जप्त केली आहे. शवविच्छेदनात मृतदेहात छर्रे आढळले आहेत. रमेश धोडिंबा जांगळे (वय 25, रा.केळवली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

रमेश जांगळे व जानकर बंधूंमध्ये जेसीबी घरासमोरुन नेण्यावरुन वाद झाला होता. या वादातूनच जानकर बंधूंनी जांगळे यांचा नित्रळ गावच्या हद्दीत गोळी घालून खून केला. नित्रळ येथे सिमेंटच्या पाईपमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. शिकारीसाठी वापरली जाणारी बंदूक खुनासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जानकर यांची बंदूक जप्त केली आहे. शवविच्छेदनात काढलेले छर्रे व बंदूक तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

जानकर नडत असल्यानेच काढला काटा

जानकर व जांगळे यांच्यामध्ये यापूर्वी वेळोवेळी पैशावरुन वाद झाले आहेत. त्यांच्यामध्ये झालेल्या वादावादी प्रकरणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील आहे. तात्कालीक कारणानुसार जांगळे यांच्या घरासमोरुन जानकर यांनी जेसीबी नेल्याने वाद विकोपाला गेला होता. जांगळे नडत असल्यानेच जानकर बंधूंनी त्याचा काटा काढला असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

SCROLL FOR NEXT