Mud Stunt in Venna Lake Mahabaleshwar
सातारा : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात युवकाला चार चाकी गाडीवर चिखलात स्टंट करणे महागात पडले आहे. इन्स्टासाठी रील बनवणाऱ्या युवकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संग्राम गणेश शितोळे (रा.जांभे, दत्तवाडी, जि. पुणे) असे युवकाचे नाव आहे.
महाबळेश्वर येथे पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू हा या ठिकाणचा प्रसिद्ध वेण्णा लेक परिसर आहे. या भागात मुसळधार पावसामुळे घोडेस्वारी होणाऱ्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. या चिखलामध्ये सध्या काही हौशी युवक सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी चार चाकी गाडीचे स्टंट करत आहेत.
याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून मैदानात चिखल उडवत स्टंट करणाऱ्या युवकावर कारवाई केली आहे. संग्राम गणेश शितोळे राहणार जांभे दत्तवाडी जिल्हा पुणे असे युवकाचे नाव आहे. महाबळेश्वर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित युवकावर चार चाकी गाडी चिखलात घालून वेगवेगळे स्टंट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.