सातारा : तंत्रज्ञान क्रांतीमुळे हल्ली तरुणाईसह लहान मुलेही इंटरनेट गेममध्ये गरफटू लागली आहेत. सवयीच्या आहारी गेल्याने त्याची व्यसनात परिणिती होत असल्याने या मुलांचा कुटुंबासह मित्रपरिवाराशी सुसंवाद हरवत आहे. एकलकोंडी झाल्याने या मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून शैक्षणिक भविष्य टांगणीला लागत आहे. सुज्ञ पालकांनी वेळीच इंटरनेट गेमची सवय सोडवण्याची गरज आहे, असे मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले आहे.
हल्ली तरुणाईसह अजाणत्या वयातील मुलांना इंटरनेट गेमचे व्यसन जडल्याने पालक त्रस्त झाले आहेत. कुटुंब, मित्र परिवाराशी संवाद हरवत चालल्याने सामाजभानही हरपत आहे. त्यातून काही कुटुंब, मित्र परिवाराशी संवाद हरवत चालल्याने सामाजभानही हरपत आहे. त्यातून काही विघात कृतींना बळ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी विशेष काळजी घेत मुलांना अभ्यासाव्यतिरीक्त मोबाईल देणे टाळावे. तसेच मुलांच्या सोशल वापर व सर्चिंगवर लक्ष द्यावे, मुलांना मैदानी व बुध्दीला चालना देणार्या खेळांकडे वळवावे, असा सल्ला मानसोपचार तज्ञांनी दिला आहे. दरम्यान, इंटरनेट ही सध्याच्या जीवनशैलीतील अत्यावश्यक बाब असली तरी त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.