Satara News | शहरवासीय सर्दी, खोकला, तापाने त्रस्त

पंधरा ते वीस दिवसांत सोलापूर शहरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
Cough relief tips
Satara News
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

पंधरा ते वीस दिवसांत सोलापूर शहरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. एका रुग्णाचे दर आठवड्याला सरासरी २५० ते ५०० रुपये साधी वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार यावर खर्च होत आहेत.

हवामानात बदल झाला म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आजारी पडत आहेत. पावसाळा असूनही कधी ऊन तर कधी पाऊस, हवेतील दमटपणा यामुळे सर्दी, खोकला व ताप यांचे रुग्ण वाढले आहेत.

यातून पूर्णपणे बरे होण्यास सात ते दहा दिवसांचा कालावधी रुग्णांना लागत आहे, त्यानंतर भरपूर अशक्तपणा जाणवणे ही सार्वत्रिक तक्रार रुग्णांकडून ऐकायला मिळत आहे. आजारपणाची आर्थिक झळ रुग्णांना बसत आहे. आठवडाभराच्या औषधांसाठी ५०० ते ५५० रुपये लागतात, अशी माहिती मेडीकल विक्रेत्यांनी दिली.

ही आहेत लक्षणे...

नाकात, घशात, श्वासनलिकेत कफ जमा होत आहे. ब्राँकायटिसची लक्षणे दिसून येत आहेत. जीव घाबरतो. खोकल्याची उबळ येते. कफ पांढरा, पिवळा असतो. ताप येतो. उष्ण, रूक्ष, दमट हवामान असल्याने रुग्णांना अशक्तपणा अधिक जाणवत आहे. दमट वातावरणात दमा, अॅलर्जीचा त्रास रुग्णांना अधिक होत आहे.

हे करावेत उपाय

आरओचे पाणी पित असला, वारंवार हात धुवत असला तरी शरीरांतर्गत प्रतिकारशक्ती कमी नको. त्याकडे लक्ष द्यायला हवे. शीतपेय पिण्यात आल्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास झालेले रुग्ण आहेत. रात्री जागरण करणे टाळावे, फास्ट फूड खाऊ नका, नियमित व्यायाम करा, आरोग्यदायी जीवनशैली जगा, तणावांपासून दूर रहा, असे डॉक्टरांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news