सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सातारा दौर्यावर येत आहेत. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सत्कार, सातारा तालुका बाजार समिती इमारतीचे भूमिपूजन, राधिका मार्गावर नियोजित प्रांताधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन आणि भाजपच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहेत. भाजप कार्यालयाचे सकाळी 10 वाजता भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन होईल. या कार्यक्रमानंतर प्रांताधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन होईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्जपुरवठा करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावस्कर, कोअर कमिटीच्या सदस्या प्रिया शिंदे, भरत पाटील, मकरंद देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.