Gadchiroli News|गडचिरोली राज्यातील सर्वात अग्रेसर जिल्हा असेल : देवेंद्र फडणवीस

सुरजागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन
Surjagad Ispat Private Limited Company
सुरजागड इस्पात प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.Pudhari News Network

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे ३५० एकर जागेवर १० हजार कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज (दि. १७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पार्थ पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Surjagad Ispat Private Limited Company
गडचिरोली : १६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षली महिलांचे आत्मसमर्पण

लोखंडाचे तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोलीत

गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातील सर्वात अग्रेसर जिल्हा असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरजागड इस्पात कारखान्यामुळे आठ दशलक्ष टन लोह उत्पादन होईल. लायड मेटल्स कंपनीद्वारे चार दशलक्ष टन उत्पादन आधीच होत आहे. त्यामुळे भविष्यात लोखंडाचे तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोलीत होईल. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर जिल्हा राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Surjagad Ispat Private Limited Company
गडचिरोली : ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी

गडचिरोली जिल्ह्याला एज्युकेशन हब बनवणार

आदिवासी समाजात उद्योगांमुळे समृद्धी येत आहे. येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. विमानतळही होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला एज्युकेशन हब बनवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. चामोर्शी ते काकीनाडा पर्यंत जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

Surjagad Ispat Private Limited Company
गडचिरोली : डुम्मे नाल्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू

सुरजागड इस्पात कारखान्यामुळे आदिवासी समाजात आर्थिक सुबत्ता

सुरजागड इस्पात कारखान्यामुळे आदिवासी समाजात आर्थिक सुबत्ता येईल. रोजगार उपलब्ध होईल. एक विकसित शहर निर्माण होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. महायुतीच्या सरकारने महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. महिला आणि शेतक-यांसाठी सरकार अनेक चांगले निर्णय घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news