महाबळेश्वरात दाट धुके अन् पावसाची संततधार File Photo
सातारा

Mahabaleshwar Heavy Rain Dense Fog | महाबळेश्वरात दाट धुके अन् पावसाची संततधार

महाबळेश्वर शहर व परिसराला धुंवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसराला धुंवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गेल्या काही दिवस सूर्यदर्शनाने सुखावलेल्या महाबळेश्वरवासियांना पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळाली गेल्या दोन तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी, जोरदार वारे, दाट धुके व पावसाची संततधार यामुळे जनजीवन गारठले आहे.

मे महिन्यांपासून महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार बॅटींग केली आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यात 228 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार कायम आहे. दिवसभर धुक्याची दुलई पसरली असल्याने सर्वत्र अंधुक अंधुक दिसत आहे.

धुक्याबरोबर जोरदार वारे व पाऊस असल्याने हवेतील गारठा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सोमवारी सकाळी 8.30 पर्यंत शहरात 73.50 मिमी 2.894 इंच पावसाची नोंद झाली असून 01 जून ते 15 सप्टेंबर सकाळी 8.30 अखेर 5813.40 मिमी 228.874 इंच पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT