सातारा; पुढारी वृत्तसेवा : विलासपूर येथे दरवर्षी फिरोज भाई पठाण मित्र समूह आयोजित शिवजयंती महोत्सव साजरा होतो. या कार्यक्रमास मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी, सातारा जिल्ह्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर विलासपूर येथे उभारणार आहे, अशी घोषणा केली. त्यांनी सर्वच शिवभक्तांना घराघरात शिवरायांचे विचार बिंबवण्याचे सुद्धा आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विलासपूर येथे भव्य अशी मिरवणूक आणि महाआरतीचेदेखील आयोजन फिरोज भाई पठाण मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले होते.