

सातारा : साताऱ्यातील शिवतीर्थावर शिवजयंतीनिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. मोठ्या संख्येने सातारकर यांची उपस्थिती होती.
फटाक्यांची आतषबाजीत साताऱ्यात गांधी मैदान ते पोवई नाका असे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीला छत्रपती शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या मिरवणुकीनंतर पोवई नाका शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त अभिवादन करत महाराजांची महाआरती केली. यावेळी या शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळाली.