सातारा

सातारा : तापोळ्याच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू

निलेश पोतदार

कोरोनाच्या महासंक्रमणानंतर पर्यटन स्‍थळे सुरू होत आहेत. हळूहळू पर्यटकांची पावले पर्यटन स्‍थळाकडे वळू लागली आहेत. यातच महाराष्ट्राचे मिनी काश्मीर व नवीन महाबळेश्वर होऊ पाहणाऱ्या तापोळ्याच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू झाले आहे. त्‍यामुळे तापोळा बामणोली शिवसागर जलाशयात बोटिंग करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

पावसाळ्यानंतर या विभागांमध्ये फुललेल्या निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू झाल्‍याने पर्यटक बोटिंगचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

कोरोनाच्या १० महिन्याच्या महासंक्रमणानंतर पर्यटकांची पावले या विभागाकडे वळू लागली आहेत.

तापोळ्याच्या जलाशयामध्ये बोटिंगसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

पर्यटकांची सुरक्षितता व योग्य खबरदारी घेत तापोळा बोटींगने चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे.

त्यामुळे तापोळा बोटिंग व बामनोली बोटिंग स्थळ पर्यटकांनी फुलून गेले आहे.

स्पीड बोट त्याचबरोबर हाताने चालवण्याची बोट या ठिकाणी उपलब्‍ध करून देण्यात आल्‍या आहेत.

निळा अथांग शिवसागर जलाशयात नौका विहाराचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटकांनी यावे असे आवाहन व निमंत्रणही स्थानिक नागरिकांनी व हॉटेल व्यवसायिकांनी केले आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT