सातारा

साताऱ्यातील कास रोडवर भीषण अपघात; दोन कारची समोरासमोर धडक

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा – कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीत आज शुक्रवारी (दि.२८) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण सातारा जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.  गारवा हॉटेल जवळ हा अपघात झाला असून अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT