साई सावंत
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा दुरुपयोग करून पुण्यातील अली अमानत शेख या भामट्याने जानेवारी महिन्यापासून बॉलिवूड सिने अभिनेते आमिर खान यांना संपर्क केली. मी स्वतः उदयनराजे बोलतोय असे भासवत "माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील त्यांना मदत करा". असे सांगून फसवणूक करत होता. फसवणूक करणारा अली अमानत शेख हा उदयनराजे भोसले बोलतोय असे सांगून लोकांना भेटण्यासाठी अभिनेते आमिर खान यांच्याकडे पाठवत होता.
असे फोन कॉल केले होते. या सर्व प्रकाराची आमिर खान यांच्या टीमने उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांना माहिती दिल्यानंतर पंकज चव्हाण यांनी स्वतः संशयित आरोपीला फोन करून खातिर जमा केली असता. तो उदयनराजे भोसले बोलतोय अशी माहिती देत असल्याचे समोर आले. याप्रकरणी अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास शाहूपुरी पोलीस करत आहे. या प्रकरणात कोणाची फसवणूक झाली आहे का याचीही माहिती घेतली जात आहे.