अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन आत्येभावाकडून बलात्कार Pudhari File Photo
सातारा

सातारा : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन आत्येभावाकडून बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

पाटण : पुढारी वृत्तसेवा

कोयना विभागातील एका खेडेगावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच अल्पवयीन आत्येभावानेच बलात्कार केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी 4 जुलै रोजी घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या आत्येभावाने अत्याचार केला. तिच्या फिर्यादीवरून कोयना पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन संशयिताची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. संदीप शितोळे करत आहेत.

बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. दोन दिवसांपूर्वी पाटण येथेही विविध पक्षांच्या वतीने महिला, विद्यार्थिनींनी हजारोंच्या संख्येने अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात विराट मोर्चा काढला. मात्र, त्यानंतरही अशा घटना आता पाटण तालुक्यात ग्रामीण विभागातही घडत असल्याने याबाबत पोलिस व संबंधित प्रशासनाने कठोर भूमिका घेत कायद्याचा वचक दाखवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT