सांगली : पुढारी वृत्तसेवा
दैनिक 'पुढारी'च्या 'एज्युदिशा 2022' या शैक्षणिक प्रदर्शन व मार्गदर्शन व्याख्यानमालेस शनिवारी दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांतून मोठा प्रतिसाद मिळाला. सांगलीत राममंदिर जवळील कच्छी भवन येथे हे प्रदर्शन सुरू आहे. यातून विविध क्षेत्रातील करिअरची संधी, विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणारे राज्यभरातील नामवंत विद्यापीठ, शिक्षण संस्था, क्लासेस यांचे सुसज्ज स्टॉल्स् येथे मांडण्यात आले आहेत. करिअर निवडीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार्या या प्रदशर्नास अनेक विद्यार्थी, विद्यार्थिंनी पालकांसह भेट देऊन बारकाईने माहिती घेत आहेत.
दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'पुढारी एज्युदिशा-2022' या शैक्षणिक प्रदर्शन व मार्गदर्शन व्याख्यानमालेस शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. दैनिक 'पुढारी'च्यावतीने सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. दैनिक 'पुढारी'चा एज्युदिशा हा उपक्रमही महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या.
या प्रदर्शनात नामांकित शिक्षण संस्थांचे स्टॉल्स, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरसंदर्भातील मार्गदर्शनाचा खजाना उपलब्ध आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग व स्पर्धा परीक्षा या क्षेत्रांबरोबरच बदलत्या काळात सर्वच क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. त्याची माहिती प्रदर्शनात मिळत आहे.
या प्रदर्शनासाठी पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीसी, लातूर आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायोसिस, पुणे हे सहप्रायोजक आहेत. यात नामांकित संस्थांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्याने होत आहेत.
त्याचप्रमाणे प्रदर्शनामध्ये एमपीएससी, यूपीएससी तयारी, आयटी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व संधी, इंजिनिअरिंगमधील नव्या संधी, फिशरीज, नॅनोटेक्नॉलॉजी तसेच उज्ज्वल करिअरसाठी कोरोनानंतरच्या विविध नव्या संधी याची माहिती मिळत आहे.