

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देणारे 'एज्युदिशा 2022' शैक्षणिक प्रदर्शन व ज्ञानसत्राचे शुक्रवार, दि. 10 रोजी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअरच्या अगणित संधी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा 2020 शैक्षणिक प्रदर्शनाचे दि. 10 ते 12 जूनदरम्यान सांगलीत राम मंदिर कॉर्नर येथील कच्छी जैन भवनमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीसी, लातूर असणार आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायोसिस, पुणे हे सहप्रायोजक आहेत.
यावेळी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, आयआयबी-पीसीबी लातूरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रा. चिराग सेन्मा, एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटीचे प्रोजेक्ट डायरेक्टर नागेश जाधव, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणेचे डॉ. राकेश आफरे, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे तसेच अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे थॉमस अघमकर, सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणेचे गणेश लोहार, दै, 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नामांकित संस्थांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्याने प्रदर्शन काळात आयोजित केली आहेत. प्रदर्शनामध्ये 'एमपीएससी, युपीएससी तयारी', 'आयटी मार्गदर्शन', 'स्पर्धा परीक्षा व संधी', 'इंजिनिअरिंगमधील नव्या संधी', 'फिशरीज', 'नॅनोटेक्नॉलॉजी तसेच उज्ज्वल करिअरसाठी कोरोनानंतरच्या विविध नव्या संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळणार आहे. या व्याख्यानामधून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होणार आहे. 'पुढारी'च्या या प्रदर्शनाची शैक्षणिक वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच 12 वीचा निकाल लागला आहे. 10 वीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी 'पुढारी' एज्युदिशा प्रदर्शनाला नक्कीच भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.