विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा-कराड रस्त्यावर ढवळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील तरूणाचा मृत्यू झाला. विशाल जगन्नाथ सुतार (२३, रा. घोटी खुर्द, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री घडली होती. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सध्या विटा शहरातील नाथाष्टमी उत्सव सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या सर्वच मार्गावर प्रचंड वाहतूक आहे.
शनिवार दि.१५ एप्रिल रोजी रात्री खानापूर तालुक्यातील घोटी खुर्द येथील विशाल सुतार दुचाकीवरून (क्रमांक एमएच १० सीटी ०४७६) चालला होता. यावेळी दुचाकी घसरून तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिक तरूणांनी जखमी सुतार याला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विशालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची विटा पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मारूती हजारे करीत आहेत.
हेही वाचा;