विजय लाळे
विटा :"जय काली कलकत्ते वाली, तेरा वार ना जाये खाली, हात नही हिलाता, पैर नही चलाता,फिर भी ये लडका,कमाल हैं दिखाता /" असं म्हणत जादूगार हा हा म्हणता, आडव्या झोपलेल्या माणसाला हवेतला हवेत वर उचलतो, असले डॉयलॉग आणि प्रयोग फक्त जादूच्या खेळांत आपल्याला बघायला मिळतात. पण पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यातील विट्यात कुणी बंगाली बाबा, माजी आमदारा च्या घराभोवती बंगाली काळी जादू करीत असेल तर काय म्हणाल ?
हो, प्रश्न अगदी रास्तच विचारला आहे. विट्यात जादूटोणा विरोधी कायद्याला फाट्यावर मार णारा प्रकार घडलेला आहे. त्याचे झाले आहे असे की, विट्यातील लकडे यांच्या निवासस्था ना समोरून, बुधवानी ब्रदर्स यांचे घर, तसेच पुढे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष भाजप नेते वैभव पाटील यांच्या राहत्या घरासमोरील कोपऱ्यात माती, मोहरी, काळे उडीद आणि तत्सम वस्तू असले ली पुडी ओतत एक जण निघाला होता.
आज सोमवारी दुपारी भर बाराच्या सुमारास हा प्रकार काही जणांनी पाहिला, काही लोकांनी उत्सुकते पोटी तर काहींनी संशय आला म्हणून त्याचा गुपचूप पाठलाग केला. तर पाटील यांच्या घरा शेजारील मोकळ्या जागेत त्यांनी टीप पुढे असलेल्या कागद टाकला आणि तिथून एकाच्या गाडीवर बसून निघून गेला. झालं.
ज्यांनी हा प्रकार बघितला त्यांनी त्यांना तासाभरात शोधून काढले. चोप मार दिला आणि विटा पोलीस ठाण्यावर नेले. तेथे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे कार्यकर्त्यांसह दाखल झाले. तोपर्यंत पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. त्याच्याकडून मोबाईल काढून घेतलेला आहे. त्याच्या मोबाईल मध्ये वैभव पाटील यांच्या नवीन घराचाही नकाशा असल्या चे समोर येत आहे.
याबाबत वैभव पाटील यांनी, असले प्रकार कशासाठी ? असा सवाल करत आम्हाला काही नाही, परंतु घरच्या लोकांना अकारण त्रास होतो असल्या गोष्टींचा असे म्हणत पोलिसांनीच यावर योग्य की कारवाई करावी असे सांगितले आहे. दरम्यान, विटा पोलीसांनी संबंधित दोघांना विट्यातील ग्रामीण रुग्णालयाकडे वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. तर काही कार्यकर्ते अद्यापही पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून आहेत, आणि दिवस सरताच या गोष्टीचा शहरभर बोभाटा होत आहे.