US-Israel Attacks Iran ( फोटो पीटीआय)
सांगली

US - Iran War |आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष

सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहितीसाठी संपर्क करण्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आखाती देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगली जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालिन संचालन केंद्राशी संपर्क साधण्यात आलेला आहे. कोणत्याही नागरिकांकडून आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या परिचित व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

नागरिकांनी आवश्यकतेनुसार पुढील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा:

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली नियंत्रण कक्ष : 0233-2600500

सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100

मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT