सांगली

युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगावातील त्या दोन विद्यार्थीनी सुखरूप

अविनाश सुतार

कडेगाव, पुढारी वृत्तसेवा : मेडिकल शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी सुखरूप आहेत. या दोन्ही विद्यार्थिंनीसह १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाला ट्रेनने रवाना झाले असून पुढे ते हंगेरी बोर्डवर येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांना दिली. मंत्री कदम यांनी शिवांजली व ऐश्वर्या या दोघीशी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला.

'तुम्ही घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देशात आणण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांशी वारंवार चर्चा सुरू असून लवकरच तुम्ही मायदेशात याल, असे सांगत कदम यांनी संबंधित विद्यार्थिनींना दिलासा दिला. दरम्यान, मागील ६ दिवसापासून रशियाचा युक्रेनवर भ्याड हल्ला सुरू आहे. दरम्यान, कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली व हिंगणगाव खुर्द येथील ऐशवर्या या दोन विद्यार्थी युक्रेनमधील खरकीव्ह येथे अडकलेल्या होत्या. त्यांचे तिथे खाणे पिण्याचे वांदे झाले होते. तर जीवाला ही मोठा धोका निर्माण झाला होता.त्यात युक्रेनने मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांचा दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते.

या पार्श्वभूमीवर मंत्री कदम (Viswajit Kadam) यांचे या विद्यार्थिंनीना मायदेशात आणण्यासाठी युद्धाच्या पहिल्या दिवसापासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज मंगळवारी त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारा या विद्यार्थिनीशी संपर्क साधला. यावेळी सुखरूप असल्याचे विद्यार्थिंनी सांगितले. तसेच आज (मंगळवार) पहाटे आम्ही दोघी आणि १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थी आता रोमानिया येथील हॉस्टेलवर थांबणार असून पुढे ते हंगेरी सीमेवर जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान विद्यार्थी सुखरूप असून त्यांचा संपर्क होत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे डेंजर झोन असलेल्या खरकीव्हमधून त्या बाहेर पडल्या असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

पिंपरीतील मेट्रोची झलक

SCROLL FOR NEXT