‘शमा’ उद्या रसिकांच्या भेटीला Pudhari File photo
सांगली

‘शमा’ उद्या रसिकांच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : उत्तम अभिनय, भव्य नेपथ्य, साज शृंगार, मनाचा ठाम घेणारे संगीत, डान्स आणि ड्रामाचा कलाविष्कार घेऊन ‘शमा’ हे भव्य नाटक शनिवारी (6 जुलै) रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाविषयी सांगलीकरांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबतर्फे येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात दुपारी 2 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

नाट्यपंढरी सांगलीतील प्रतिभावान कलाकार ‘शमा’ या नाटकाचा प्रयोग घेऊन रसिकांसमोर येत आहेत. या नाटकाच्या व्यावसायिक प्रयोगाचा प्रारंभ दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबच्या पाठबळाने होत आहे. या नाटकाची संकल्पना, दिग्दर्शन, पटकथा आणि सादरीकरण हे सर्व सांगलीकर कलाकारांनी केले आहे. उत्तम अभिनय, लक्ष वेधून घेणारी वेशभूषा, रंगभूषा आणि तितक्याच ताकदीचे कथानक हे या नाटकाचे वेगळेपण आहे.

दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबतर्फे आयोजित मिस आणि मिसेस कस्तुरी 2024 या सौंदर्य स्पर्धेत ‘शमा’ या नाटकाचा टिझर सादर झाला होता. या नाटकातील सर्व कलाकारांनी भूमिकेला अनुसरून लक्षवेधी रॅम्पवॉक केला होता. नाटकाचा टिझर आणि कलाकारांच्या रॅम्पवॉकने उपस्थित सर्वजण भारावून गेले होते. सांगलीत 6 जुलै रोजी या नाटकाचा भव्य प्रयोग होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. या नाटकाच्या प्रयोगाची तारीख आता एक दिवसावर आली आहे. रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

अल्कश निर्मिती प्रस्तुत, विनोद आवळे लिखित व दिग्दर्शित ‘शमा’ हे नाटक दैनिक पुढारीच्या पुढाकाराने रसिक प्रेक्षकांसमोर शनिवारी येत आहे. नाटकासाठी मेकअप् आर्टिस्ट किशोरी साळुंखे आहेत.

कलाकारांना शुभारंभ इव्हेंटस् (मयुरी कांते) आणि अनुज ज्वेलर्स यांचे साहाय्य लाभणार आहे. हे नाटक सर्वांसाठी खुले आहे. कस्तुरी क्लबचे सभासद व मिस आणि मिसेस कस्तुरी सांगली या सौंदर्य स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. कस्तुरी क्लबच्या सभासद महिला तसेच मिस आणि मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी व रसिकांनी दैनिक पुढारीच्या सांगली कार्यालयातून पास घेणे आवश्यक आहे. पाससाठी संपर्क- सोनम साळुंखे, मो. नं. 7020139480, सागर चौगुले- 8261856501.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT