gold theft Pudhari
सांगली

Sangli Theft Case | शिराळ्यात जनावरांच्या गोठ्यातून साडेपाच लाखांचे दागिने लंपास

शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Shirala Jewelry Stolen

शिराळा : तालुक्यातील पाडळी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसून अज्ञात चोरट्याने सुमारे ५ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद प्रशांत विठ्ठल पाटील (वय ४०, रा. पाडळी, ता. शिराळा) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २६) मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत चोरट्याने पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये प्रवेश केला. शेडमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये बोरमाळ, नेकलेस, मंगळसूत्र, चैन, ब्रॅसलेट, अंगठ्या, टॉप्स, पुतळ्या तसेच चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा माल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदा जाधव करत असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT