Shirala MIDC Oil Factory Fire Pudhari
सांगली

Shirala Oil Factory Fire | शिराळा औद्योगिक वसाहतीतील ऑईल कारखान्याला आग; कच्चा माल, यंत्रसामुग्री जळून खाक

अग्निशमन दलाच्या बंबांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली

पुढारी वृत्तसेवा

Shirala MIDC Oil Factory Fire

शिराळा : शिराळा औद्योगिक वसाहतीमधील तेल निर्मिती करणाऱ्या कारखान्यास अचानक आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि.३१) दुपारी चारच्या दरम्यान घडली. विश्वास साखर कारखाना व ईश्वरपूर येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील औद्योगिक वसाहती मधील विलास बजरंग खोत यांची गुरुकृपा रिनोबल एनर्जी ही प्लास्टिक पासून पायरोसिस ऑईल तयार करणारी कंपनी आहे. याठिकाणी पाच ते सहा कामगार कामाला असतात.आज दुपारी अचानक आग लागली.यावेळी येथील कामगार पळून बाहेर पडले. यामुळे जीवित हानी टळली.

या आगीमध्ये कच्चा माल, यंत्रसामुग्री, जेसीबी, पत्र्याचा शेड आदी जळून खाक झाली. घटनास्थळी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, श्रीराम नांगरे, नगरसेवक राजसिंह पाटील, नगरसेवक अवधूत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील , पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना माहिती कळताच त्वरित विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले. तर आमदार सत्यजीत देशमुख यांनी घटनेची दूरध्वनी वरून माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT