Crime Against Minor Boy  Pudhari File Photo
सांगली

Miraj Crime | मोबाईलवर अश्लील क्लिप दाखवून आठ वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रकार

मिरज तालुक्यातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Crime Against Minor Boy Miraj Sangli

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील एका गावात आठ वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाला घरी नेऊन मोबाईलवर अश्लील व्हिडिओ चित्रण दाखववून नराधमाने हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित वैभव उर्फ यश सुभाष सूर्यवंशी (वय १८) याच्या विरोधात सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित वैभव सूर्यवंशी याने संबंधित बालकाला त्याच्या घरी नेले. त्या ठिकाणी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला.

त्यानंतर व्हिडिओमध्ये जो अश्लील प्रकार केले त्या प्रकारचे चाळे त्या पीडित बालकाबरोबर करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान सांगली ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT