‌Sangli News : ‘आरोग्य‌’मधील वेतनाची ओरड

एप्रिलचा पगार थकीत ः यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली : मे मध्यावर आला तरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अनेक कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला सुरू असलेली पगाराची ओरड संपणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रत्येक महिन्याच्या किमान पाच तारखेपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला उशिराने पगार होण्याची समस्या आता नित्याचीच बनली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, घरभाडे, मुलांच्या शाळेची फी, बँकेचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवताना कसरत करावी लागते.

12 महिन्यांचे वेतन मिळाले तरी कधी?

महिना आणि त्या महिन्याचे वेतन मिळालेली तारीख अशी ः एप्रिल- 14 मे 2025, मे- 12 जून 2025, जून- 15 जुलै 2025, जुलै- 21 ऑगस्ट 2025, ऑगस्ट- 25 ऑगस्ट, ऑक्टोबर- 13 नोव्हेंबर, नोव्हेंबर- 10 डिसेंबर, डिसेंबर- 14 जानेवारी, जानेवारी- 17 फ ेब्रुवारी, फ ेब्रुवारी- 18 मार्च, मार्च- 30 एप्रिल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news