Sangli Mayor Dahi Handi  AI Photo
सांगली

DJ Action Sangli | महापौरांच्या दहीहंडी कार्यक्रमातील डीजेवर पोलिसांचा दणका; ध्वनी नियम उल्लंघन केल्याने कारवाई

पोलीस अधीक्षक तुषार दोशी 'अॅक्शन मोड'वर ; डीजे वाजवणारे व मालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sangli Mayor Dahi Handi

​सांगली: वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात सांगली पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेला इशारा आता प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. महापौरांच्या दहीहंडी कार्यक्रमात डीजेच्या आवाजाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आणि आदेशाला केराची टोपली दाखवल्याप्रकरणी कारवाईचा दणका देण्यात आला आहे. डीजे वाजवणारे व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीजे आणि उत्सव काळातील ध्वनी प्रदूषणा विरोधात राज्यभरातून नागरिकांतून असंतोष वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस प्रशासनाने ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे

सण-उत्सवांच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, आजारी व्यक्ती व बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने जिल्हाभरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ नुसार कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

तरुण भारत स्टेडियम येथे साथीदार युथ फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महापौरांच्या दहीहंडी कार्यक्रमात पोलिसांच्या सूचना धाब्यावर बसवून अतिउच्च आवाजात डॉल्बी सिस्टीम सुरू ठेवण्यात आली होती. पोलीस पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आवाज कमी करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, आयोजक आणि ध्वनिक्षेपक चालकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले.

पोलीस प्रशासनाने कोणतीही गय न करता तात्काळ कारवाईचा दणका दिला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दहीहंडी आयोजक मुकुंद कांबळे, डॉल्बी मालक चंद्रसेन सव्वाशे, ऑपरेटर शांतीनाथ उळागड्डे आणि जनरेटर मालक अमोल पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियम मोडणारा कितीही मोठा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे, असा स्पष्ट संदेशच या धडक कारवाईने पोलिसांनी दिला आहे.

खाकीचा दणका अन् नागरिकांकडून कौतुक

​सण आणि उत्सवांच्या नावाखाली चालणाऱ्या 'डॉल्बी आणि डीजे'च्या धुमाकूळाने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. अशा वेळी कोणतीही राजकीय अथवा सामाजिक प्रतिष्ठा न पाहता, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी सांगली पोलिसांनी दाखवलेले हे धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे.

​पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलिसांच्या विशेष पथकाने थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन घेतलेली ही आक्रमक भूमिका कायदा पाळणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलून सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि कारवाई करणाऱ्या पथकाचे संपूर्ण शहरातून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT