Sangli News : सव्वादोन लाख वाहनधारकांचे एचएसआरपीकडे दुर्लक्ष

दंडाची कारवाई सुरू; ६० टक्के वाहनांना नवी नंबर प्लेट
High Security Number Plate
High Security Number PlatePudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी वाहनांना ३१ जुलैपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवून घेण्याची मुदत होती. पण ज्यांनी ती बसवली नाही, अशांना उप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सव्वा महिन्यापासून दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. गतवर्षापासून एचएसआरपी बसवण्यास वेळोवेळी मुदतवाढ दिली होती. आता ३१ जुलैरोजी याची मुदत संपली आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने : १४ लाख ८१ हजार ६६७

एकूण दुचाकी : १० लाख ९४ हजार २९८

१ एप्रिल २०१९ पूर्वीची जिल्ह्यातील एकूण

वाहने : ५ लाख ५९ हजार २९७

कारवाई केलेले वाहनधारक : ५१०

वसूल केलेला दंड : २ लाख १० हजार रुपये

एचएसआरपी...

बसविलेली वाहने : ३ लाख ३३ हजार ६८२

बसविण्याची टक्केवारी : ५९.६६ टक्के

नसलेली वाहने : २ लाख २५ हजार ६२४

दुचाकी, ट्रॅक्टरसाठी शुल्क : ४५० रुपये

तीनचाकी वाहनांसाठी शुल्क : ५०० रुपये

सर्व प्रकारच्या चारचाकींसाठी शुल्क : ७४५ रुपये

सांगली जिल्ह्यातील सव्वादोन लाख वाहनांना एचएसआरपी बसवलेली नाही. आम्ही आता प्रत्येक वाहनांना दोन हजार रुपयांप्रमाणे दंड आकारणी सुरू केली आहे. एकच वाहन अनेक वेळा सापडल्यास दंड वाढवण्यात येईल. वाहन धारकांनी एचएसआरपी बसवून सहकार्य करावे.
- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news