माडग्याळ : माडग्याळ तालुका स्थापन करण्याच्या मागणीसाठी बुधवारी दिवसभर कोळगिरी, व्हसपेठ, गुड्डापूर, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे कडकडीत बंद पाळत बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यात आला. दरम्यान, आसपासच्या वीस ते पंचवीस गावांतील राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णदेव गायकवाड, सरपंच अनिता माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत, माजी सरपंच विठ्ठल निकम, सुजाता माळी, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, विजय हाके, सोसायटीचे माजी अध्यक्ष केशव सावंत, रंजना हाके, सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप करगणीकर, डॉ. चंद्रशेखर हिट्टी, डॉ. चंद्रमणी उमराणी, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. प्रकाश सावंत, बापू सावंत, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत, मल्हारी कसबे, राजू कांबळे उपस्थित होते. माडग्याळ तालुका स्थापन करण्याच्या मागणीसाठी गेले आठ दिवस माडग्याळमध्ये बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. यावेळी तलाठी अभिजित गाढवे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
कोळगिरी, व्हसपेठ, गुड्डापूर, लकडेवाडी, जाडरबोबलाद गावांनी बंद पाळून जाहीर पाठिंबा दिला. लकडेवाडी सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कटरे, माजी सरपंच एकनाथ बंडगर, बाजार समितीचे माजी सभापती महादेव अंकलगी, गुड्डापूरचे माजी उपसरपंच दानाप्पा पुजारी, सुरेश पुजारी, गणी मुल्ला, मनोहर हुवाळे, व्हसपेठचे माजी सरपंच अशोक हुवाळे, कोळगिरीचे माजी सरपंच सदाशिव सिद्धरेड्डी, कोळगिरीचे सरपंच हेळवी, आसंगीचे माजी सरपंच सीताराम गायकवाड यांनी उपोषणस्थळी पाठिंबा जाहीर केला.
थंडीमुळे उपोषणकर्त्यांना त्रास
माडग्याळ तालुका करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. थंडी वाढल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदारांनी फिरवली पाठ
गेले आठ दिवस माडग्याळ येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. शासनाने कोणतीच दखल न घेतल्याने मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. पण आमदार पडळकर यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.