उज्ज्वला लोंढे Pudhari
सांगली

Electrocution Death Woman |कवठेमहांकाळात नळाला पाणी भरताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

Sangli News | कवठेमहांकाळ शहरातील विजयनगर परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Kavathe Mahankal Electrocution Death Woman

कवठेमहांकाळ : शहरातील विजयनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. उज्ज्वला गंगाधर लोंढे (वय ५०, रा. विजयनगर, कवठेमहांकाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला लोंढे आपल्या घरात दैनंदिन कामकाज करत होत्या. घरातील नळाला पाणी आल्याने मोटर सुरू करण्यासाठी त्यांनी मोटरच्या वायरला हात लावला. वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने त्यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, काही वेळानंतर ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उज्ज्वला लोंढे यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उज्ज्वला यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT