

सांगली : वाहनांवरील नियमबाह्य एलईडी बल्ब आणि जादा लाईट लावणाऱ्या वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. प्रखर एलईडी दिव्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपून काही सेकंद समोरील काहीच दिसत नाही. त्यामुळे चालकांचे वाहनांवर नियंत्रण न राहता अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रकार जीवावर बेतू शकतो. यामुळे अशा प्रखर दिव्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
प्रखर एलईडी दिव्यांना झटका
कारवाईचा कालावधी ः एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026
वायुवेग पथकामार्फत 939 वाहनांवर कारवाई
4 लाख 1 हजार 700 रुपये दंड वसूल
प्रखर एलईडी दिवे बसवल्याबद्दल मार्च 2026 मध्ये 105 वाहनांवर कारवाई
54 हजार 500 रुपये दंड वसूल
तेरा महिन्यांमध्ये एकूण 1 हजार 41 वाहन चालकांवर कारवाई
4 लाख 56 हजार रुपये दंड वसूल