अंजर अथणीकर
सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा तोफा धडाडेत आहेत. नगराध्यक्षपदाच्या आठ जागेसाठी 41 तर नगरसेवक पदाच्या 181जागेसाठी 594 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी आता 2 डिसेंबररोजी मतदान असून, आठ पालिकामधील 2 लाख 57 हजार 977 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत 50 टक्के पदाची महिलांसाठी पदे असलेतरी पुरुषापेक्षा महिला मतदारांची संख्या यावेळी अधिक आहे.
ईश्वरपूर - 30, विटा- 26, आष्टा- 24, तासगाव- 24, जत- 23, पलूस - 20, शिराळा- 17, आटपाडी - 17 .
एकूण नगराध्यक्ष पदे : आठ
एकूण नगरसेवक पदे : 181
नगरसेवक पदांसाठी रिंगणात एकूण उमेदवार : 594
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार : 41
एकूण लोकसंख्या : 2,90,571
एकूण मतदार : 2, 57, 977
पुरुष मतदार : 1,28,961
महिला मतदार : 1,28,993
इतर : 23