सांगली

सांगली : लग्नात हुंडा न दिल्‍याने विवाहितेचा छळ

अमृता चौगुले

जत (सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील सनमडी येथे लग्नात हुंडा दिला नाही, लग्नाच्या वेळी माहेरहून दागिने, पैसे व मानपान केला नाही, म्हणून सासरच्यांनी विवाहितेला जाच केला. या बाबत विवाहितेने पती श्रीकांत जगन्नाथ शिंदे, सासरे जगन्नाथ सिताराम शिंदे, सासू कमल जगन्नाथ शिंदे (सर्व रा. सनमडी) यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विवाहानंतर विवाहितेचा पती श्रीकांत शिंदे व सासू कमल शिंदे, सासरे जगन्नाथ शिंदे यांनी लग्नाच्या वेळी माहेरून दागिने व पैसे आणले नाहीत. तसेच लग्नात योग्य तो मानपान केला नाही या कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत.

पतीने दारू पिऊन विवाहितेस लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे. तसेच सासू व सासरे यांनी वेळोवेळी माहेरून पैसे व दागिने व योग्य मान न केल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT