सांगली

Sangli Grampanchayt Election : कडेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.६४ टक्के मतदान; २० तारखेला मतमोजणी

backup backup

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साह आणि शांततेच्या वातावरणात ८०.६४ टक्के मतदान पार पडले. यामध्ये एकूण ९३ हजार ४४१ मतदारांपैकी ७५३५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. यामध्ये पुरुष ३८७७० तर महिला ३६५८५ मतदारांचा समावेश आहे. ३९ सरपंच पदासाठी ११२ तर ४०० सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ७५० उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे.

रविवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही. परंतु ९ नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत १३.१६ टक्के मतदान झाले. तर ११.३० पर्यंत ३१.३१ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारच्या कालावधीत गावोगावी मतदारांना मतदानासाठी आणण्यात उमेदवार व कार्यकर्ते व्यस्त दिसत होते. दुपारी १.३० पर्यत ५२.३२ टक्के मतदान झाले.

दुपारनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदार याद्या तपासून राहीलेल्या मतदारांशी संपर्क साधला आणि मतदारांना वहानामधुन मतदान केंद्रात चढाओढीने आणले. बहुतांशी मतदारांनी उमेदवारांच्या वहानातुन न येता स्वत : येवुन मतदान केल्याचे देखील पहायला मिळाले. दुपारी ३.३० पर्यत ७०.०९ टक्के मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ९३ हजार ४४१ मतदारांपैकी ६५४९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. यामध्ये पुरुष ३२८४० मतदार तर महिला ३२६५६ मतदारांचा समावेश आहे. तर ३.३० नंतर राहिलेले मतदान खेचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. दिवसाअखेर सुमारे ८०.६४ टक्के मतदारांनी मतदान केले.

२0 डिसेंबरला मतमोजणी : निकालाचे वेध

कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणूकसाठी मतदान पार पडले. तर निवडणुकीची मतमोजणी २0 डिसेंबर रोजी होणार आहे.कॉग्रेस आणि भाजप मध्ये चुरशीचा सामना झाल्यामुळे आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सरपंच व सदस्य बाजी मारतात याकडे नजरा लागल्या आहेत. दरम्यान लक्षवेधी झालेल्या तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे वेध येथील नेते आणि कार्यकर्त्यांना लागले आहेत.

पैजांना उधाण

आपलाच उमेदवार विजयी होणार अशी खात्री असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यानी गावोगावी पैजा लावल्या आहेत. त्यामुळे पैजाना उधाण आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT