Sangli Chain Snatching
सांगली : सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या हाताला हिसडा मारून चोरट्याने तब्बल 40 तोळे सोने लंपास केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये. या घटनेमुळे मात्र सांगलीत एकच खळबळ उडालीये.
सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्नकार्यासाठी काढले होते. दोन दिवसांपूर्वी लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता ध्यानचंद्र सकळे हे त्यांच्या कारमधून एका कारचालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी आले होते.
ध्यानचंद्र सगळे हे त्यांच्या कारमधून उतरताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीला हिसडा मारून पोबारा केला. यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडालीये. माहितगार व्यक्तीकडून ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून स्थानिक गुन्हे शाखेची आणि विश्रामबाग पोलिसांची पथके चोरट्याच्या मागावर रवाना करण्यात आली होती. संशयावरून एकास पोलिसांनी अटक देखील केली आहे.