सांगली

सांगली : छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा

अमृता चौगुले

जत (जि.सांगली), पुढारी वृत्तसेवा : जत (जि. सांगली) शहरात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास प्रशासनाने हरकत घेतली होती. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा केली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सांगली येथे पार पडलेल्‍या बैठकीत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी येत्‍या दोन दिवसांत देणार असे सांगितले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा ज्या चबुतऱ्यावर बसविण्यात येणार आहे. त्या चबुतऱ्यावर महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे वजन पेलेल काय या संदर्भातील तपासणी अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.

छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या परवानगी घेतल्यानंतरच पुतळा बसवावा याबाबतच्या प्रशासनाने तशा सूचना पुतळा समितीला दिल्या होत्या. चबुतऱ्याचे काम पूर्ण होऊन बरेच वर्ष झाले होते. परंतु बहुप्रतिक्षीत असलेला पुतळा बसवण्याचे काम शिवजयंतीला होणार होते. परंतु परवानगी नसल्याचे कारण दाखवत प्रशासनाने याठिकाणी विनापरवानगी छत्रपतीचा पुतळा बसवता येणार नाही. असे स्पष्ट केले होते. पुतळा तयार होऊनही न बसल्याने शिवप्रेमी यांच्यात नाराजी होती. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी आदेश लागू केला होता.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने १ हजाराहून अधिक पोलिसाचा बंदोबस्त ठेवला होता. यात राखीव दलाच्या तुकड्याच्या समावेश होता. यामुळे काही दिवस वातावरण तणावाचे होते. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप, आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, उमेश सावंत, संतोष मोटे, अण्णा भिसे, सद्दाम आतार प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक उदय डूबल ,यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT