सांगली

वाघवाडी फाटा-इस्लामपूर रस्त्यावर मुलाचा खून की अपघात?

सोनाली जाधव

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाघवाडी फाटा-इस्लामपूर रस्त्यावर  सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट (वय १३रा. अभियंता नगर, पेठ ता. वाळवा )  या  मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या मुलाची डोक्याची कवटी फुटली आहे. त्याच्या बाजूला झोपलेले दोघेही सुरक्षित आहेत. त्यामुळे खून  की अपघात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे लोक  दगड घडवण्याचे काम करत आहेत. दगड काम करणारे तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. झोपलेल्या अवस्थेत हर्षवर्धन याचा सकाळी मृतदेह मिळल्याने एकच खळबळ उडाली. हर्षवर्धन याच्या डोक्याची कवटी फुटली आहे.  त्याच्या बाजूला झोपणाऱ्यांनी त्याच्या डोक्यावरून वाहन गेल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, चेतन माने पथकासह श्वानपथक, फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT