विटा : बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन ला काहीही किंमत नसते असं तुमच्याच भागातील ज्येष्ठ नेते दिवंगत आर. आर. पाटील यांनी भर विधिमंडळात सांगितलं होतं, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले.
विट्यात भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभाताई चोथे यांच्यासह २६ भाजप उमेदवारांची प्रचार सभा झाली. यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश खाडे,माजी आमदार सदाशिवराव पाटील, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रतिभाताई पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी शिंदे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, काल एकनाथ शिंदे यांची सभा येथे झाली त्या सभेमध्ये काय बोललं गेलं कसं बोललं गेलं याची माहिती मिळाली. मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. मला 2014 सालची गोष्ट आठवते आम्ही आमच्या सरकार आल्यामुळे आनंदात होतो विधानसभेच्या सभागृहातला पहिलाच दिवस तिथे या भागातले उमेदवार नेतृत्वजे आपल्या हयात नाहीत. आर. आर. आबा पाटील ते बोलत होते. कदाचित त्यांचे ते शेवटचं भाषण असावं त्यानंतर ते आजारी पडले मात्र त्या दिवशी माजी आमदार सदाशिवराव पाटील त्या सभागृहात उपस्थित होते.
आर आर आबांनी सांगितलं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये राहुल मी अनेक मंत्रीपद भूषवली परंतु मी फार प्रयत्न केला नंबर एक व्हायचा परंतू मी काही नंबर एक होऊ शकलो नाही. बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन ला काहीही किंमत नसते. असं ते म्हणाले मी म्हणत नाही. माझ्यावर नाही, किमान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा. देवा शपथ मी हे म्हणत नाही अशी पुष्टी जोडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीररीत्या डिवचले आहे.