सांगली येथे खून File Photo
सांगली

कासेगावातील खून अनैतिक संबंधातून?

तिघांना अटक; खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

कासेगाव (ता. वाळवा) येथील पांडुरंग भगवान शिद याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी पांडुरंग याच्या एका नातेवाईकासह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी नावाबाबत गुप्तता बाळगली आहे. संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

पांडुरंग याचा कासेगाव येथील त्याच्या शेताजवळ हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. निर्जनस्थळी त्याचा खून केल्याने तसेच या गुन्ह्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने खुनाचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होतेे. या गुन्ह्याचा तातडीने उलगडा करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक आणि इस्लामपूर, कासेगाव पोलिसांची वेगवेगळी पथके याचा तपास करीत होती.

पांडुरंग याचा अनैतिक संबंधातून त्याच्याच नातेवाईकाने दोघा मित्रांच्या मदतीने खून केल्याचे तपासात समोर आले होते. त्यादृष्टीने तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला पांडुरंग याच्या एका नातेवाईकावर संशय बळावला. तसेच संबंधित नातेवाईक घरातून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. पांडुरंग याच्या नातेवाईकाचा शोध घेत असताना त्याला त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली. यावेळी त्याने मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT