सांगली

द्राक्षांना एकरी १ लाख मदत द्या : सुमन पाटील यांचे विधान भवनासमोर आंदोलन

अविनाश सुतार

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत आलेला आहे. एकट्या जिल्ह्यातील सुमारे २० हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी. नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासह अनेक मागण्या घेऊन आमदार सुमन पाटील यांनी आज (दि.१५) नागपूर येथील विधानभवन समोर आंदोलन केले. Suman Patil

मागील चार-पाच वर्ष सातत्याने निसर्गाची अवुकृपा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी हावलदिल झाले आहेत. यासह शेतक-यांच्या विविध मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावरती आमदार सुमन पाटील, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन केले. Suman Patil

सलग तीन वर्षे अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या अर्थिक नुकसानीची भरीव आर्थिक मदत करावी. द्राक्षे घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा. बाग उभी करायला एकरी तीन लाख रुपये खर्च आहे. धुके आले तरी रोग येतो, पाणी कमी पडले तरी अडचण होते, द्राक्ष खूपच नाजूक पीक आहे. द्राक्ष पिकास पीक विमा लागू करताना १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या काळातील पीक विमा लागू करावा.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाच्या वसुलीसाठी ताकादा लावला जातो. त्यामध्ये शिथिलता द्यावी. नाशिकमध्ये गारपीट झाली. म्हणून सरसकट पंचनामे झाले. या धर्तीवर सांगली जिल्ह्यातही सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. अशा मागण्या आमदार सुमनताई पाटील यांनी केल्या आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT