मिरज : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी मिरजेत रविवारी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका निघाल्या. काही मिरवणूका ह्या पारंपारिक वाद्य वाजवून व सुरेख निघाल्या. मात्र काही मंडळांनी लेझर लाईटचा वापर करून डॉल्बी सहित दणदणाट केला. आज नव्या दिवशी मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव येथे व कृष्णा घाट येथे नदीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन झाले. शहरातील सुमारे 109 गणेश मंडळाच्या श्री मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीने झाले. 109 पैकी सुमारे 60 गणेश मंडळांनी वाद्यविना मिरवणूक काढून मूर्तीचे विसर्जन केले.
काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. मात्र काही मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट वाजवला. काही मंडळांनी लेझर लाईटचाही वापर केला. डॉल्बी आणि लेझर लाईटला बंदी असूनही बंदी आदेश झुगारून त्याचा वापर करण्यात आला. पोलिसांकडून ही या प्रकाराची रीडिंग घेण्यात आले. मिरज शहराबरोबर मिरज ग्रामीण भागातील विविध गावांमधील सुमारे 88 सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री मूर्तीचे विसर्जन काही विहिरी, आड व तलावांमध्ये करण्यात आले.